दुबई येथे झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय आयुष परिषदेत पुण्यातील डॉ. हरिश पाटणकर व डॉ. स्नेहल पाटणकर यांना पोस्टर प्रेझेंटेशनसाठी प्रथम क्रमांक मिळाला आहे. केंद्रीय आयुष मंत्रालय, सायन्स इंडिया फोरम आणि वर्ल्ड आयुर्वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.९ ते ११ नोव्हेंबर दरम्यान दुबई येथे ही पहिली आंतरराष्ट्रीय आयुष परिषद आयोजित करण्यात आली होती. डॉ. हरिश व डॉ. स्नेहल पाटणकर यांनी 'डायग्नॉस्टिक ट्रीटमेंट व्हॅल्यू इन आयुर्वेदिक ट्रायकॉलॉजी शुरू टेक्नॉलॉजी' या विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन केले. दुबई विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. इसा अल मोहंमद बस्तकी यांच्या हस्ते डॉ. पाटणकर यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
|